For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहन बागानकडे पहिल्यांदाच आयएसएल लीग शील्ड

06:17 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोहन बागानकडे पहिल्यांदाच आयएसएल लीग शील्ड
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

भारतीय फुटबॉल क्षेत्रातील बलाढ्या समजल्या जाणाऱ्या मोहन बागान एफसी संघाने पहिल्यांदाच आयएस लीग शिल्ड फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यता मोहन बागानने मुंबई सिटी एफसी संघाचा 2-1 अशा गोल फरकाने पराभव केला.

या सामन्यात मोहन बागानतर्फे लिस्टोन कोलॅकोने 28 व्या मिनिटाला तर जेसन कमिंग्जने 80 व्या मिनिटाला गोल नोंदविले. मुंबई सिटी एफसीतर्फे एकमेव गोल 89 व्या मिनिटाला फ्री किकवर चेंगटेने केला. या स्पर्धेच्या इतिहासात मुंबई सिटी एफसी संघाने आतापर्यंत दोन वेळेला विजेतेपद मिळविले होते. मात्र यावेळी त्यांचे जेतेपद हुकले. 2024 च्या आयएस लीग शिल्ड फुटबॉल स्पर्धेत बलाढ्या मुंबई सीटी एफसी संघाने बागानवर यापूर्वी 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळविला. या स्पर्धेतील जेतेपदामुळे आता मोहन बागान एफसी संघाने पहिल्यादाच एएफसी चॅम्पियन्स लीग-2 स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. सॉल्ट लेक स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यावेळी सुमारे 60 हजार शौकिन उपस्थित होते. या सामन्यानंतर आता आयएसएल स्पर्धेचा लीग टप्पा समाप्त झाला असून आता 6 संघांमध्ये प्ले ऑफ गटातील सामन्यांना 19 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. या प्ले ऑफ गटातील स्पर्धेत पहिले 2 संघ मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी यांना थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. तर गोवा, ओडिशा, केरळ ब्लास्टर्स आणि चेनियन या चार संघांमध्ये बाद फेरी पद्धतीनुसार सामने होतील. त्यानंतरच उपांत्य फेरीतील उर्वरित दोन संघ निश्चित ठरतील. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील अंतिम सामना 4 मे रोजी खेळविला जाईल.

Advertisement

मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील अंतिम सामन्यावेळी आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. या सामन्यामध्ये बागानच्या हॅमिलला पंचांनी दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने बागान संघाला या सामन्यातील उर्वरित कालावधीत 10 खेळाडूंसह खेळावे लागले. 2024 चा फुटबॉल हंगाम बागानला खूपच यशस्वी ठरला आहे. बागानने या हंगामाच्या सुरुवातील ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. त्यानंतर ईस्ट बंगालने सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. कोलकाताच्या मोहमेडन स्पोर्टींग क्लबने पहिल्यांदाच आय लीग फुटबॉल स्पर्धा जिंकत पुढील हंगामात होणाऱ्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला.

Advertisement
Tags :

.