For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहित रैनाची क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये वर्णी

07:00 AM Aug 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोहित रैनाची क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये वर्णी
Advertisement

अभिनेता मोहित रैनाने टीव्हीपासून मोठ्या पडद्यापर्यंत स्वत:च्या दमदार अभिनयाची छाप पाडली आहे. मोहित आता एका क्राइम थ्रिलर सीरिजमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये तो गँगस्टरच्या भूमिकेत असून निर्मात्यांकडून याचा प्रोमो व्हिडिओही प्रदर्शित करण्यात आला आहे. मोहित हा झी5 चा क्राइम शो रंगबाजच्या चौथ्या सीझनमध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. रंगबाज सीरिजने मागील काही वर्षांमध्ये एक मजबूत पकड निर्माण केली आहे. राजकारण, सत्ता अन् त्याच्याशी निगडित महत्त्वाकांक्षांच्या पार्श्वभूमीवर निर्मित या फ्रेंचाइजीचा हिस्सा झाल्याने उत्साहित आहे. या सीझनचे वैशिष्ट्या याची भव्य कहाणी आहे. गुन्हे पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक असतील असे मोहितने म्हटले आहे. यात मी एका अशा युवाची कहाणी दाखविणार असून ज्याची स्वत:ची स्वप्नं अन् आदर्श आहेत. परंतु त्याचा प्रवास भय अन् शक्तीत बदलून जातो. हा एक कठोर अन् अनेक पदर असलेले पात्र आहे, जे परिस्थिती, महत्त्वाकांक्षा आणि अस्तित्वाची लढाई कशाप्रकारे एका व्यक्तीला बदलून टाकते हे दर्शविते, असे मोहितचे सांगणे आहे. मोहितपूर्वी रंगबाज सीरिजमध्ये साकिब सलीम, जिमी शेरगिल अन् विनीत कुमार सिंह यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.