‘सुपरकॉप’च्या भूमिकेत मोहनलाल
मल्याळी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार मोहनलाल यांचा दृश्यम 3 हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. मोहनलाल आता स्वत:चा आगामी चित्रपट ‘अथिमनोहरम’वरून चर्चेत आहे. मोहनलाल यांनी या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. या चित्रपटात मोहनलाल हे पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. चित्रपटाचा हा लुक सोशल मीडियावर गाजतोय.
मागील 4 दशकांपासून चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या मोहनलाल यांच्या चित्रपटावरून चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ दिसून येते. अथिमनोहरम चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत जगदीश, सिद्दीकी, मनोज के. जयन, भामा अरुण आणि बीना पप्पू यासारखे अनेक दाक्षिणात्य कलाकार सहाय्यक भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बीना पप्पू यांनी केले आहे. तर थारुण मूर्ती यांनी सहदिग्दर्शन केले आहे.
मोहनलाल यांचा हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचसुमारास शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘किंग’ प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर मोठी चुरस दिसून येणार आहे.