For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वृषभ’ चित्रपटात मोहनलाल

06:31 AM Dec 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘वृषभ’ चित्रपटात मोहनलाल
Advertisement

मोहनलाल यांचा आगामी चित्रपट ‘वृषभ’च्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढविली आहे. ट्रेलरमध्ये मोहनलाल यांचा दमदार अंदाज दिसून येत आहे. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये मोहनलाल यांची व्यक्तिरेखा स्वत:च्या मुलासोबत दिसून येते. मुलगा स्वत:च्या पित्याला शत्रूंपासून वाचवू पाहत असतो. काही लोक मोहनलाल यांच्या व्यक्तिरेखेला मारू इच्छित असतात. याचदरम्यान एक डॉक्टरही दिसून येतो, जो मोहनलाल यांच्या व्यक्तिरेखेवरून मोठा खुलासा करतो आणि अचानक कहाणी ऐतिहासिक काळात पोहोचते. चित्रपटाची कहाणी दोन टाइमलाइनमध्ये चालतो. याचदरम्यान मोहनलाल यांचा अॅक्शन अंदाज पहायला मिळतो. ट्रेलरमध्ये कहाणी ऐतिहासिक काळात जाते, तेव्हा एका भव्य साम्राज्याची झलक दिसून येते. याला व्हीएफएक्सद्वारे आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत अॅक्शनदृश्यांसोबत परिपूर्ण वाटतात. या चित्रपटाला नंदा किशोर यांनी लिहिले असून दिग्दर्शितही केले आहे. ट्रेलरमध्ये मोहनलाल ऐतिहासिक काळातील एका योद्ध्याच्या रुपात दिसून येतात. मोहनलाल यांचा वृषभ चित्रपट नाताळादरम्यान प्रदर्शित होईल. 25 डिसेंबर रोजी वृषभ चित्रपट मल्याळी, तेलगू, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.