For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऑपरेशन गंगा’मध्ये मोहनलाल

07:00 AM Sep 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ऑपरेशन गंगा’मध्ये मोहनलाल
Advertisement

सुपरस्टार मोहनलाल यांच्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव ‘ऑपरेशन गंगा’ असून हा देशाच्या एका मोठ्या बचाव अभियानावर आधारित असणार आहे. मोहनलाल यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू मोहन यांनी केले आहे. चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत अभिनेता अर्जुन रामपाल, आदिल हुसैल आणि भाग्यश्री बोरसे दिसून येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती गोकुलम गोपालन हे स्वत:च्या श्री गोकुलम मूव्हीज बॅनर अंतर्गत करणार आहेत. हा चित्रपट व्यापक स्तरावर निर्माण केला जात असून यात मल्याळी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांची प्रतिभा दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक पुतळा दिसून येत असून त्याच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल आहे. नजीकच एक लढाऊ विमान दिसून आले आहे. चित्रपटाच्या कहाणीत सैन्य आणि देशाबद्दलच्या कर्तव्याशी निगडित गोष्टी दिसून येणार आहेत. चित्रपटाचे नाव भारताच्या एका मोठ्या बचाव अभियानावर ठेवण्यात आले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी हे बचाव अभियान राबविण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.