For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरूतेचे मोहन भुजबळ कलाश्रीच्या आठव्या सोडतीचे विजेते

09:15 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुरूतेचे मोहन भुजबळ कलाश्रीच्या आठव्या सोडतीचे विजेते
Advertisement

सोडतीपूर्वी मोफत आरोग्य तपासणी-रक्तदान शिबिर : मान्यवरांच्या हस्ते ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यांना सन्मानित

Advertisement

बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री बंब अँड स्टील फर्निचरच्या आठव्या सोडतीत सुरूते ता. चंदगड येथील मोहन भुजबळ हे भाग्यवान विजेते ठरले आहेत. त्यांना थ्री पीस वॅन्ड्रॉप बक्षिसादाखल देण्यात आले. कलाश्री उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश डुकरे, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर, रोटरीचे नागेश मोरे, अशोक कोळी, रोटे. अशोक बदामी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर व आरोग्य शिबिरासाठी सहकार्य केलेले केएलई कॉलेजचे डॉ. आकाश व डॉ. जगबिंदर सिंग यांचा भेटवस्तू व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना कलाश्री उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत प्रगती करून सामान्य जनतेची स्वप्नपूर्ती केली आहे, असे सांगितले. त्यानंतर मान्यवर व ग्राहकांच्या हस्ते ड्रॉ काढून भाग्यवान विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये मुख्य ड्रॉ विजेते मोहन भुजबळ यांच्यासह चार हॉटपॉट विजेते ज्ञानदेव लोकूर (शगमनहट्टी), सुनीता पाटील (येळ्ळूर), सत्यम तावडे (सिंधुदुर्ग), शिवकुमार गडद (वडगाव), व्हिजीटर भाग्यवान विजेते पुंडलिक मजकूर (मजगाव), राजाराम पाटील (कंग्राळी खुर्द), संजय कांबळे (मच्छे), चेतन मादार (चापगाव), सुनील धर्माधिकारी (शहापूर), उत्कृष्ट कार्य केलेले डीलर्स प्रकाश धबाले, मनोहर पाटील, सुनील आजगावकर, कृष्णा भरणकर, प्रकाश पाटील, सिद्धापा तुनकीनहाळ या सर्वांना भेटवस्तू व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement

तर एक हजारवरील खरेदी भाग्यवान ग्राहकमध्ये बसवराज मडवाळ, कार्तिक बँक ऑफ बडोदा, भरमाणी हलगेकर, संतोष एस. के., महादेव पट्टण यांना ऊ. 5001, रु. 2501, रु. 2001, रु. 1501, व रु. 1001 ची गीप्ट व्हाऊचर देण्यात आली. यावेळी केएलई हॉस्पिटल व रोटरी क्लब ऑफ बेळगाव मीडटाऊनच्यावतीने कलाश्री उद्योग समूहाच्यावतीने घेण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी व नेत्रतपासणी शिबिराचा 70 पेक्षा अधिक नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना औषधे देण्यात आली. तसेच काही लोकांनी रक्तदान केले. त्यांनाही प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन टी. डी. पाटील यांनी केले. पवार सर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.