For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहम्मेडन स्पोर्टींग आय लीग विजेता

06:02 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोहम्मेडन स्पोर्टींग आय लीग विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/ शिलाँग

Advertisement

भारतीय फुटबॉल क्षेत्रातील सर्वात एक जुना फुटबॉल क्लब म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहम्मेडन स्पोर्टींग क्लबने पहिल्यांदाच आय लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या जेतेपदामुळे मोहम्मेडन स्पोर्टींग संघाला इंडियन सुपरलीग टॉप टियरमध्ये बढती मिळाली.

आय लीग स्पर्धेतील झालेल्या सामन्यात मोहम्मेडन स्पोर्टींगने शिलाँग लेजाँग एफसी संघाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात पहिल्याच मिनिटाला मोहम्मेडन स्पोर्टींगचे खाते अॅलेक्सीस गोम्सने उघडले. 15व्या मिनिटाला डग्लस टेरडीनने शिलाँग लेजाँगला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. सामन्यातील 62व्या मिनिटाला मोहम्मेडन स्पोर्टींगचा दुसरा आणि निर्णायक गोल इव्हगेनी कोझलोव्हने केला. या सामन्यातील विजयामुळे  मोहम्मेडन स्पोर्टींगने 23 सामन्यातून 52 गुण घेतले असून त्यांचा अद्याप एक सामना बाकी आहे. स्पर्धच्या गुणतक्त्यात श्रीनिधी डेक्कन संघ 22 सामन्यातून 44 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीनिधीचे अद्याप दोन सामने बाकी असून त्यांनी ते जिंकले तरी मोहम्मेडन स्पोर्टींगच्या गुणाशी बरोबरी करू शकणार नाहीत. या स्पर्धेतील नेरोका एफ्सी आणि श्रीनिधी डेक्कन यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता.

Advertisement

2024 च्या फुटबॉल हंगामामध्ये ईस्ट बंगाल संघाने सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली. त्यानंतर मोहन बागान संघाने ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेचे जेते पद पटकाविले. बागानचा संघ आयएसएल शिल्ड आणि जेते पद जिंकण्याच्या मार्गावर आहे. 2024 च्या फुटबॉल हंगामातील मोहम्मेडन स्पोर्टींगचा हा 15 वा विजय आहे.

Advertisement

.