For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहम्मद शमीची ‘अर्जुन’साठी शिफारस

06:36 AM Dec 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
मोहम्मद शमीची ‘अर्जुन’साठी शिफारस
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अलीकडेच झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेतील भारताचा एक हिरो ठरलेल्या मोहम्मद शमीची बीसीसीआयने या वर्षीच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

33 वर्षीय वेगवान गोलंदाज शमीने वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केले होते. सूत्रांनी सांगितल्यानुसार, पुरस्काराच्या यादीत शमीच्या नावाचा समावेश करण्याची खास विनंती बीसीसीआयने क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. आधीच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. पण आता त्याची देशातील दुसऱ्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Advertisement

विश्वचषक स्पर्धेत केवळ 7 सामन्यात शमीने 5.26 धावांच्या सरासरीने सर्वाधिक 24 बळी मिळविले. पहिल्या चार सामन्यात त्याला खेळविण्यात आले नव्हते. हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर त्याला अंतिम संघात स्थान मिळाले होते.  भारतीय संघ सध्या द.आफ्रिका दौऱ्यावर असून दोन कसोटी मालिकेसाठी शमीचा संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे. यातील पहिली कसोटी 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे सुरू होणार आहे.

यावर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी मंत्रालयाने 12 सदस्यीय समिती नियुक्त केली असून मेजर ध्यान चंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कारांसाठी क्रीडापटूंची निवड करणार आहे. निवृत्त न्यायाधीश एएम खानविलकर हे या समितीचे प्रमुख असून सहा आंतरराष्ट्रीय खेळाडेंही या समितीत आहेत. माजी हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू कमलेश मेहता, बॉक्सर अखिल कुमार, महिला नेमबाज व राष्ट्रीय प्रशिक्षक सुमा शिरूर, माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्रा, बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, पॉवरलिफ्टर फरमान पाशा यांचा या पॅनेलमध्ये समावेश आहे.

Advertisement
Tags :

.