For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोहम्मद कासिम गुज्जर दहशतवादी घोषित

07:00 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोहम्मद कासिम गुज्जर दहशतवादी घोषित
Advertisement

लष्कर-ए-तोयबा हस्तकावर गृह मंत्रालयाची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

गृह मंत्रालयाने गुऊवारी लष्कर-ए-तोयबाचा हस्तक मोहम्मद कासिम गुज्जर याला बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा 1967 (युएपीए) अंतर्गत दहशतवादी घोषित केले. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार कासिम गुज्जर दीर्घकाळापासून दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र, दारूगोळा, आयईडी पुरविण्यासह अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे. अलिकडच्या काही दिवसात छुप्या कारवायांमध्ये त्याचा सहभाग वाढल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. मोहम्मद कासिम गुज्जार सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राहत आहे. तो मूळचा रियासी जिल्ह्यातील माहोरच्या अंगारला गावचा रहिवासी असून अनेक दशकांपासून फरार होता. मोहम्मद कासिम गुज्जरने घडवलेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले आहेत, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. भारताविऊद्ध युद्धाची योजना आखण्यात त्याचा सहभाग आहे. 2022 मध्ये माता वैष्णोदेवी यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्यामागील तो मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यात चार लोक मारले गेले आणि दोन डझनहून अधिक जखमी झाले होते. यापूर्वी 2021 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिह्यातील भाजप नेत्याच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातही गुज्जरचा सहभाग होता. त्या अनुषंगाने देशाची एकता आणि अखंडतेच्या विरोधात कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर निर्दयीपणे कारवाई केली जाईल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.