मोहम्मद अझऊद्दीनला ईडीकडून समन्स जारी
20 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
वृत्तसंस्था/ हैदराबाद
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझऊद्दीनला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुऊवारी समन्स बजावले. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या (एचसीए) अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अझहरवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मात्र, अझहरने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अझहरला चौकशीसाठी बोलावले आहे. ईडी टीम एचसीएमधील अनियमिततेची चौकशी करत आहे. उप्पल पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने अझहरला समन्स बजावले आहे. 61 वषीय माजी क्रिकेटपटूवर यापूर्वीही मॅच फिक्ंिसगचे आरोप असल्यामुळे बीसीसीआयनेही त्याच्यावर बंदी घातली होती. मात्र, नंतर आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने अझहरची निर्दोष मुक्तता केली होती.
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांनी राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामात आर्थिक अनियमितता केली. खासगी कंपन्यांना चढ्या दराने कंत्राटे देऊन असोसिएशनचे कोट्यावधी ऊपयांचे नुकसान केले. याप्रकरणी 3 एफआयआर दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे. याच तपासाच्या फेऱ्यात आता अझऊद्दीन अडकला आहे. समन्स पाठवण्यापूर्वी तपास यंत्रणेने तेलंगणातील 9 ठिकाणी छापे टाकले होते. या काळात डिजिटल उपकरणांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
एचसीएचे सीईओ सुनीलकांत बोस यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार अझऊद्दीनविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. 2009 मध्ये राजकारणात आलेला आणि काँग्रेसमधून खासदार झालेला अझहर काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा सदस्य राहिला आहे. त्याने उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 2009 ते 2014 पर्यंत तो खासदार होता.