ईडीसमोर मोहम्मद अझहरुद्दीन हजर
11:01 PM Oct 08, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने विचारले प्रश्न
Advertisement
वृत्तसंसथा/ हैदराबाद
Advertisement
काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन मंगळवारी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीसमोर हजर राहिले आहेत. ईडीने त्यांचा जबाब नोंदवून घेतला असल्याचे समजते. 61 वर्षीय माजी खासदाराला हैदराबाद येथील ईडी कार्यालयात 3 ऑक्टोबर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु अझहरुद्दीन यांनी मुदत वाढवून मागितल्याने 8 ऑक्टोबर रोजी बोलाविण्यात आले होते. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे. याप्रकरणी ईडीने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झडती घेतली होती.
Advertisement
Next Article