For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॉड्यूलर ब्रिज सिस्टीम सैन्यात सामील

11:25 PM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॉड्यूलर ब्रिज सिस्टीम सैन्यात सामील
Advertisement

डीआरडीओ अन् एलअँडटीकडून विकसित :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सैन्यात मॉड्यूलर ब्रिज सिस्टीमला सामील करण्यात आले आहे. मॉड्यूलर ब्रिज सिस्टीम सैन्यात सामील झाल्याने सैन्याच्या इंजिनियर्स कॉर्प्सच्या क्षमतेत मोठी भर पडणार आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक ठिकणी सैन्य आणि रणगाड्यांना तैनात करण्यास  मदत होणार आहे.

Advertisement

नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात मॉड्यूलर ब्रिजला सैन्यात अधिकृत स्वरुपात सामील करण्यात आले. मॉड्यूलर ब्रिजला डीआरडीओ आणि लार्सन अँड टुब्रोने मिळून विकसित केले आहे. या कार्यक्रमात सैन्यप्रमुख जनरल मनोज पांडे, सीडीएस अनिल चौहान, डीआरडीओ आणि संरक्षण मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी सामील झाले.

संरक्षण मंत्रालयाने मॉड्यूलर ब्रिजच्या 2585 कोटी रुपयांच्या कराराला मागील वर्षी फेब्रुवारीत मंजुरी दिली होती. या कराराच्या अंतर्गत मॉड्यूलर ब्रिजचे 41 सेट्स निर्माण केले जाणार आहेत. मॉड्यूलर ब्रिजमुळे सीमेवरील सैन्याच्या हालचालींमध्ये मोठी वाढ होणार आहे. विशेषकरून पश्चिम सीमेवर आव्हानात्मक भौगोलिक स्थितीत मॉड्यूलर ब्रिजचा मोठा लाभ होईल. मॉड्यूलर ब्रिजच्या या करारामुळे संरक्षण प्रकरणी आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन मिळणार आहे.

मॉड्यूलर ब्रिजमध्ये एक 8 गुणिले 8 हेबी मॉबिलिटी व्हीकल, दोन लाँचर व्हीकल सामील आहेत. मॉड्यूलर ब्रिजचा प्रत्येक सेट 46 मीटर लांब मॅकेनिकल ब्रिज निर्माण करण्यास सक्षम आहे. हे मॉड्यूलर ब्रिज सैन्याच्या मॅन्युअली-लाँच मीडिया गिरडर ब्रिजची जागा घेतील. मॉड्यूलर ब्रिज सिस्टीमच्या मदतीने कमी वेळेत लांब ब्रिज निर्माण केला जाऊ शकतो.

Advertisement
Tags :

.