For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-रशिया संबंधांची गॅरंटी म्हणजे मोदींचे धोरण

06:14 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
भारत रशिया संबंधांची गॅरंटी म्हणजे मोदींचे धोरण
Advertisement

मोदींना धमकाविणे अशक्य : पुतीन

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक पेले आहे. पंतप्रधान मोदी हे स्वत:च रशिया-भारत संबंधांची गॅरंटी आहेत. मोदींना राष्ट्रीय हितांच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी धमकाविले जाऊ शकत नसल्याचे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत.

Advertisement

राष्ट्रीय हितांच्या रक्षणाप्रकरणी पंतप्रधान मोदींच्या कठोर भूमिकेचे कौतुक केले जाते. भारत आणि भारतीय लोकांच्या विरोधात निर्णय घेण्यासाठी मोदींना भाग पाडले जाण्याची मी कल्पनाही करू शकत नसल्याचे पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन हे 2 वर्षांपासून भारत दौऱ्यावर आलेले नाहीत.

पुतीन हे मॉस्कोमध्ये आयोजित 14 व्या व्हीटीबी इन्व्हेस्टमेंट फोरम ‘रशिया कॉलिंग’मध्ये बोलत होते. रशिया आणि भारताचे संबंध सातत्याने वृद्धींगत होत असून याची गॅरंटी पंतप्रधान मोदींचे धोरण आहे. प्रामाणिकपणे बोलायचे झाल्यास भारतीय लोकांच्या राष्ट्रीय हितांच्या रक्षणाकरता मोदींच्या कठोर भूमिकेमुळे मी देखील अवाक् होऊन जात असल्याचे पुतीन यांनी नमूद केले आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रात चीनसोबतची आमची भागीदारी सुरूच राहणार आहे. अमेरिका आणि त्याचे सहकारी देश शीतयुद्धाच्या कालखंडात स्वत:चे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आर्थिक निर्बंधांचा वापर करायचे. आम्ही तेव्हाही या निर्बंधांना तोंड दिले आहे. जर आम्ही सर्वांनी एकत्र येत परस्परांना साथ दिली तर हे निर्बंध  निष्प्रभ ठरतील असे पुतीन म्हणाले.

Advertisement
Tags :

.