महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पश्चिम बंगालबाबत मोदींची मोठी भविष्यवाणी, आश्चर्यचकीत निकाल लागणार

12:53 PM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. सहा टप्प्यांसाठी मतदान झाले आहे. सातव्या टप्प्यासाठी 1 जूनला मतदान होणार आहे. तर 4 जूनला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक भविष्यवाणी केली आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की पश्चिम बंगालचे निकाल हे सर्वांच आश्चर्यचकीत करतील. न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपचे सर्वात चांगले प्रदर्शन याच राज्यात होईल असेही ते म्हणाले. बंगालमधील निवडणूक ही संपुर्ण पणे एकतर्फी असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते खवळले आहेत. बंगालमध्ये त्यातून राजकीय हत्या होत आहेत. भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकी आधी जेलमध्ये बंद केले जात आहे असा आरोपही या निमित्ताने मोदी यांनी केला.

Advertisement

भ्रष्टाचार आणि ईडीबाबत मोदी काय म्हणाले? 

Advertisement

सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. असे सक्त आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे मोदी म्हणाले. त्यामुळे ईडीने आतापर्यंत  2200 रूपये जप्त केले गेलेत. युपीए सरकारमध्ये त्यावेळी केवळ 34 लाख पकडले गेले होते असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ज्यांचे पैसे पकडले जात आहेत, ज्यांची त्यात भागिदारी आहे, तेच लोक आरडा-ओरडा करत आहेत. असे वक्तव्य करत मोदी यांनी ईडीच्या होत असलेल्या कारवायांचे समर्थन केले आहे.

कश्मीरमध्ये झाले रेकॉर्डब्रेक मतदान 

कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. काश्मीरमध्ये काही काळासाठी इंटरनेट बंद करावं लागले होते. मात्र आता तिथलेच लोक सांगत आहेत की गेल्या पाच वर्षात इंटरनेट बंद झालेले नाही. गेल्या पाच वर्षात अनेक सुविधा मिळाल्या आहेत. कश्मीरी लोक केवळ मतदान करत नाहीत तर ते आपले संविधानही त्यातून जपत आहेत. तिथल्या जनतेला आता सरकारबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. हे सरकार चांगले असल्याचे त्यांचे मत झाले आहे असेही मोदी म्हणाले.

370 हटवल्यानंतर काय बदल झाला? 

स्वत: च्या स्वार्थासाठी काही लोक 370 च्या विरोधात होते. 370 हटवणे ही देशाची गरज होती. जर हे कलम हटले तर कश्मीरमध्ये आग लागेल असे सांगितले जात होते. पण आता कश्मीरमध्ये शांतता आहे. लोकांमध्ये एकता वाढत आहे. शिवाय आपलेपणा ही वाढला आहे. त्याचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुका आणि पर्यटनातून दिसून आले आहे. जी -20 मध्येही त्याचा प्रभाव दिसून आल्याचे ते म्हणाले.

केजरीवालांचा आरोप मोदींचे प्रत्युत्तर 

जेलमध्ये कोण जाणार याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असतात. असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. याबाबत मोदींना विचारले असतात, या लोकांनी संविधान वाचले पाहीजे, देशाचा कायदा काय आहे हे समजून घेतले पाहीजे, मला कोणालाही काही सांगण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. शिवाय आरक्षण संपवणार असाहा आरोप मोदींवर होत आहे. त्यालाही त्यांनी उत्तर दिले आहे. आरक्षण संपवण्याचा आरोप हा खोटा आहे. विरोधकांनीच आरक्षण संपवण्याचे काम केले आहे. त्या विरोधात आपणच बोलत आहोत. त्यामुळे असे खोटे आरोप केले जात असल्याचेही मोदी म्हणाले.

ओडिशा सरकारचे दिवस भरले 

ओडिशा विधानसभेच्या निकालाबाबतही मोदीं वक्तव्य केले आहे. गेल्या 25 वर्षात ओडिशात विकास झालेला नाही. काही लोकांची टोळी आहे जिचे ओडिशाच्या संपुर्ण व्यवस्थेवर कब्जा आहे, ही चिंतेची बाब असल्याचेही ते म्हणाले. त्यातून ओडिशा बाहेर आला तर त्यात त्या राज्याचा फायदा आहे. ओडिशात नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे.तरही इथले लोक हे गरीब आहेत. त्यांची स्थिती सुधारत नाहीत. त्याला तिथले सरकार जबाबदार आहे. हे सरकार 4 जूनला बदलेल असे भाकीतही मोदींनी यावेळी व्यक्त केले.

Advertisement
Tags :
#Lok Sabha Elections 2024#PM Modi#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article