For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोदी-शहा निश्चित करणार राज्याचे मंत्रिमंडळ

01:28 PM Dec 14, 2024 IST | Radhika Patil
मोदी शहा निश्चित करणार राज्याचे मंत्रिमंडळ
Modi-Shah to decide on state cabinet
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

राज्याच्या नव्या मंत्री मंडळावऊन महायुतीतील तिन्हीही पक्षांमध्ये कोणताही वाद नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मंत्रीमंडळ निश्चित करतील. त्यांच्याकडून ज्या आमदारांची नावे सुचवतील तेच मंत्रीपदाची शपथ घेतील, असे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हावर हिंदूत्वावरून टिका करत आहेत. पण हिंदुत्वावऊन विचारणा करण्याचा अधिकार ठाकरे गमावून बसले आहेत. वोट जिहादच्या माध्यमातून मते मागणाऱ्या ठाकरे यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये, असा हल्लाबोल लाड यांनी केला.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेले आमदार लाड यांनी आपल्या पत्नी ...... व कन्या सायली यांच्या सोबत करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी कोल्हापूर भाजपच्यावतीने आमदार लाड यांचा शाल व अंबाबाईची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आमदार लाड म्हणाले, शरद पवार हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केंद्रात आणि राज्यात कर्तृत्वातून आपली वेगळी छाप उमटवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवार यांना आपला गुरु माणतात. त्यामुळे मोदी-पवार यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढणे चुकीचे होईल. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूकीत संविधान बचावचा नारा देऊन मते मिळवली. परंतू विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. पराभव न पचवता आल्याने महाविकास आघाडी ईव्हीएमवर आक्षेप घेत आहेत. सतत ईव्हीएमवर आक्षेप घेऊन वातावरण दुषित करणाऱ्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत.

Advertisement

ते पुढे म्हणाले, प्रियंका गांधी मोठ्या घराण्यातील आहेत. मोदींवर आरोप केल्याशिवाय त्यांचे अस्तित्व दिसत नाही. बॅलेट पेपर मतदान घेण्यास मोदी घाबरतात, अशी त्यांनी नाहक टिका केली आहे. मुळात ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टात पाच ते सहावेळा निर्णय झाला आहे, असे असूनही ईव्हीएमवऊन न्यायालयाच्या विरोधात प्रियंका गांधी व महाविकास आघाडीतील नेते बोलत आहेत हे मुळीच योग्य नाही. जवाहरलाल नेहऊ यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी धुरा सांभाळत असलेले नरेंद्र मोदी हे वाघच आहेत. त्यांच्याबाबत प्रियंका गांधी यांनी बोलूच नये.

मुंबई हनुमान मंदिरांवऊन विचारणा केली असता लाड म्हणाले, मुंबईतील एकही हनुमान मंदिर पाडले जाणार नाही, हा देशातील हिंदूना आमचा शब्द आहे. कोरोनाच्या काळात ज्यांनी आपल्या धर्मस्थळांवर बेकायदेशीरपणे मजले वाढवले आहेत, त्या मजल्यांवर आमचा आक्षेप आहे. असे बेकायदेशीर मजले आम्ही पाडणार आहे. मुंबई महापालिका निवडणूकीत एकला चलोचा नारा दिल्याशिवाय ठाकरे गटाला आता दुसरा मार्ग राहिलेला नाही. काँग्रेसही उद्धव ठाकरे यांना सोबत घेणार नाही अशी सद्यस्थिती असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगरचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.