For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

69 टक्के रेटिंगसह मोदी जगात लोकप्रिय

06:37 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
69 टक्के रेटिंगसह मोदी जगात लोकप्रिय
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आहेत. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि अलीकडेच निवडून आलेले ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांना मागे टाकले आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ने जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची नवीनतम रँकिंग जारी केली आहे. ‘मॉर्निंग कन्सल्ट’ ही जागतिक निर्णय गुप्तचर संस्था असून ती जागतिक नेत्यांच्या प्रमुख निर्णयांचा मागोवा ठेवते.

‘मॉर्निंग कन्सल्ट’ने 8 ते 14 जुलै दरम्यान सर्वेक्षण करत नवी यादी जाहीर केली. जागतिक निर्णय इंटेलिजन्स फर्मनुसार, पंतप्रधान मोदी 69 टक्के रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहेत, तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 63 टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. 25 नेत्यांच्या यादीत शेवटचे स्थान जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना मिळाले असून त्यांचे रेटिंग 16 टक्के इतके आहे.

Advertisement

जगातील शीर्ष 10 लोकप्रिय नेते आणि मान्यता रेटिंग

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (69 टक्के)

आंद्रेस मॅन्य?एल लोपेझ ओब्राडोर, अध्यक्ष, मेक्सको (63 टक्के)

जेवियर मायली, अध्यक्ष, अर्जेंटिना (60 टक्के)

व्हायोला एमहार्ड, अध्यक्ष, स्वित्झर्लंड (52 टक्के)

सायमन हॅरिस, पंतप्रधान, आयर्लंड (47 टक्के)

केयर स्टारमर, पंतप्रधान, ब्रिटन (45 टक्के)

डोनाल्ड टस्क, पंतप्रधान, पोलंड (45 टक्के)

अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया (42 टक्के)

पेड्रो सांचेझ, पंतप्रधान, स्पेन (40 टक्के)

जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली (40 टक्के)

गेल्या वषीही पंतप्रधान मोदी आघाडीवर होते

आम्ही तुम्हाला सांगूया की मागील सर्वेक्षणांमध्ये देखील पीएम मोदी ग्लोबल रेटिंगमध्ये टॉपवर होते. त्याच वेळी, इतर मोठ्या जागतिक नेत्यांचे मान्यता रेटिंग माफक पातळीवर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे अनुमोदन रेटिंग 39 टक्के, पॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचे रेटिंग 29 टक्के, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारर यांचे रेटिंग 45 टक्के आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्य?एल मॅक्रॉन यांचे रेटिंग केवळ 20 टक्के आहे. मॉर्निंग कन्सल्टने जाहीर केलेली ही यादी नियमितपणे अपडेट केली जाते. 25 देशांमध्ये झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेटर फियाला, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सूक-येओल आणि जपानचे फुमियो किशिदा हे शेवटच्या तीन स्थानावर आहेत.

Advertisement
Tags :

.