चिन्मय मिशनच्या अमृतमहोत्सवाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
चिन्मय मिशनच्या अमृतमहोत्सवाचे दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवाला बेळगावच्या चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदा, समन्वयक अतुल करंजकर, किशोर काकडे यांच्यासह 22 जण सहभागी झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्याच हस्ते चिन्मयानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. स्वामी स्वरूपानंद व तेजोमयानंद यांनी त्यांचा सत्कार केला. पंतप्रधानांनी मिशनच्या कार्याचे कौतुक केले व 2047 मध्ये जसा विकसित भारत साजरा करायचा आहे तसेच चिन्मय मिशन आपली शताब्दी साजरी करणार, असे सांगितले.
या संमेलनात विविध मान्यवरांची व्याख्याने, भक्ती संगीत, ध्यानधारणा, भजन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. विदेश मंत्री एस. जयशंकर, रिकी केज स्टेफन फ्रेजनर, मनीशंकर , सुमंत जयकृष्ण उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पार्श्वनाथ उपाध्ये यांचे भरतनाट्या होणार आहे.
