For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येत्या लोकसभा निवडणुकीतही ‘मोदी सरकार’

06:47 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
येत्या लोकसभा निवडणुकीतही ‘मोदी सरकार’
Advertisement

एबीपी-सी वोटरचा ओपिनियन पोल : जादुई आकडा पार करत निर्विवाद सत्ता स्थापन करण्याचा अंदाज

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2024 मधील सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात ‘सी वोटर’ने केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज सोमवारी जाहीर करण्यात आले. ओपिनियन पोलनुसार, सध्या निवडणुका झाल्यास सत्ताधारी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील रालोआ एकूण 543 जागांपैकी जास्तीत जास्त 295-335 जागा जिंकून तिसऱ्यांदा सरकार बनवू शकते. विरोधी आघाडी ‘इंडिया’सह काँग्रेसला 165-205 जागा मिळतील, तर इतर पक्षांना 35-65 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी ‘काऊंटडाउन’ सुरू झाल्यानंतर राजकीय पक्षांव्यतिरिक्त सर्वसामान्य लोकांनीही वेगवेगळे अंदाज आणि आकडेमोड सुरू केली आहे. सत्तेच्या चाव्या कोणाला मिळणार, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार की आणखी कुणाचे नशीब उजळणार, ‘इंडिया’चे काय होणार, भाजपशी टक्कर घेण्यासाठी 28 पक्षांची विरोधी आघाडी कितपत यशस्वी ठरणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने लोकांच्या मनातील अंदाज जाणून घेत ‘ओपिनियन पोल’ जारी केले आहेत.

लोकसभा निवडणुकीची 2024 ची उलटी गिनती सुरू झाली आहे. अशा स्थितीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी जोरात सुरू केली असून रणनीती आखण्यास सुऊवात केली आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. तर ‘इंडिया’ आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत एबीपी-सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार सध्या निवडणुका घेतल्यास एनडीएला जास्तीत जास्त 42 टक्के मते मिळतील. तर इंडिया आघाडीला 38 टक्के आणि इतरांना 20 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. लोकसभेच्या सर्व 543 जागांवर हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 13 हजार 115 लोकांशी बोलणे झाले आहे. हे सर्वेक्षण 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान करण्यात आले.

लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशात तसेच महाराष्ट्र आणि बिहारमध्ये राजकीय पक्षांचे लक्ष वाढले आहे. उत्तर प्रदेशला केंद्राच्या सत्तेची गुऊकिल्ली देखील म्हटले जाते. ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांपैकी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला 73-75 जागा मिळू शकतात. तर काँग्रेस- सपाला 4-6 जागा मिळण्याची शक्मयता आहे. तर बसपाला 0-2 जागा आणि इतरांना शून्य जागा दाखविण्यात आल्या आहेत. राज्यात रालोआला सर्वाधिक 49 टक्के मते मिळण्याची शक्मयता आहे. काँग्रेस-सपाला 35 टक्के मते मिळत आहेत, तर बसपाला 5 टक्के आणि इतरांना 11 टक्के मते मिळू शकतात.

Advertisement

.