महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आधुनिक युद्धतंत्र शस्त्रबळाच्या पलिकडचे

06:25 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पारंपरिक युद्धशैलीप्रमाणे ‘डिजिटल’ डावपेचही ठरतात निर्णायक : वायूसेना प्रमुख  चौधरी

Advertisement

► वृत्तसंस्था/ हैद्राबाद

Advertisement

आधुनिक काळात युद्धतंत्र केवळ शस्त्रबळापुरते आणि हातघाईच्या संघर्षांपुरते मर्यादित राहिलेले नसून ते त्यांच्या पलिकडे पोहचले आहे. या युद्धात आता सायबर आणि डिजिटल डावपेचांना अत्याधिक महत्व प्राप्त झाले आहे, असे प्रतिपादन भारताचे वायुसेना प्रमुख चीफ एअरमार्शल व्ही. आर. चौधरी यांनी केले आहे. ते येथे शनिवारी सेनेच्या संयुक्त पदवी संचलनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

आधुनिक युद्धतंत्र अतिशय गतीमान आणि व्यापक बनले आहे. ते केवळ सशस्त्र संघर्षापुरते किंवा दोन देशांच्या सैनिकांच्या प्रत्यक्ष युद्धापुरते मर्यादित राहिलेले नाही. सांप्रतच्या काळातील युद्धांवर माहिती तंत्रज्ञान, विदा तंत्रज्ञान, डाटा नेटवर्कस् आणि अत्याधुनिक सायबर तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव निर्माण झाला आहे. आजच्या सैनिकाला आणि सैन्याधिकाऱ्याला या परिवर्तीत होत जाणाऱ्या तंत्राची पूर्ण माहिती आणि जाण असणे आवश्यक आहे. हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी गतकाळातील मानसिकता सोडणे क्रमप्राप्त ठरणार आहे. सर्व सैनिकांनी आता हे नवे तंत्रज्ञान आणि नवे डावपेच आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या संशोधन कार्यातही आपण आघाडीवर असावयास हवे. आधुनिक काळातील युद्धे जिंकण्यासाठी हे परिवर्तन स्वीकारणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

विचारवंत सैनिकांची आवश्यकता

शत्रूच्या सैन्याविरोधात प्रत्यक्ष युद्ध करण्यासमवेतच आपली वैचारिक क्षमता वाढणेही आवश्यक आहे. व्यावसायिकता, आक्रमकता आणि पुढाकार घेण्याची वृत्ती हे सैनिकाचे महत्वाचे गुण मानले जातात. त्याचसमवेत, या नव्या काळात विचारशक्तीही महत्वाची ठरणार आहे. सर्व सैनिकांनी हे ध्यानात ठेवले पाहिजे. वायुदलाच्या प्रत्येक सैनिकाने ध्येयवाद, प्रामाणिकता आणि सर्वोत्तमता या मूळ तत्वांसमवेत आधुनिक तंत्रही अंगिकारले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ध्येयपूर्ती सर्वतोपरी

सैनिक हा हाती घेतलेले काम पूर्ण करण्याच्या वृत्तीचा असणे आवश्यक आहे. कार्यपूर्ती ही त्याची प्राथमिकता असली पाहिजे. ध्येयपूर्तीमुळे आपल्या कार्याची दिशा सुस्थिर होते. ती भरकटत नाही. अशी ध्येये पूर्ण करण्यातूनच अखेर कोणत्याही सैन्याला पूर्ण विजय मिळत असतो, हे सूत्र त्यांनी समजावून सांगितले.

वाचनाची सवय लावून घ्या

सैनिकांनी आणि सैन्याधिकाऱ्यांनी वाचनाची आवड विकसीत करणे महत्वाचे आहे. आपण जितके जास्त वाचन कराल, तितकी तुमच्या कार्यक्षेत्रातील जटीलता आधिक स्पष्टपणे तुमच्या लक्षात येईल. वाचनाची सवय आपल्या क्षमतेचे संवर्धन करण्यास साहाय्य करते. आपली दृष्टी अधिक सजग आणि व्यापक बनविते. तसेच अज्ञात आव्हानांशी संघर्ष करण्यासाठी आवश्यक असणारी सज्जता निर्माण करते. नूतन सैन्याधिकाऱ्यांसाठी व्यावसायीक ज्ञान तर महत्वाचे आहेच, पण त्यांनी अन्य क्षेत्रांमध्येही आपले कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न करावयास हवा. सैन्याधिकाऱ्यांनी आपल्या कामाशी आणि ध्येयाशी एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे. त्यांची वर्तणूक सैन्याच्या उच्च परंपरांना साजेशी असावी. त्यांनी स्वत:च्या वर्तणुकीने इतरांसाठी उदाहरण घालून द्यावे. यामुळे ते आपल्या नेतृत्वातील इतर सैनिकांमध्ये विश्वास आणि निष्ठा यांची लागण करु शकतील, अशा अनेक सूचना त्यांनी केल्या.

22 महिला अधिकाऱ्यांचा समावेश

यंदाच्या वायुदलाच्या पदवी प्राप्त अधिकाऱ्यांमध्ये 22 महिलांचाही समावेश आहे. या कार्यक्रमात एकंदर 213 अधिकारी पदवी प्राप्त करुन बाहेर पडले आहेत. या कार्यक्रमात भूमीवरील आाघाडी सांभाळणाऱ्या 25 अधिकाऱ्यांनाही वायुदलाचे कमिशन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. फ्लाईंग अधिकारी हॅपी सिंग यांना राष्ट्रपती सन्मान प्रदान करण्यात आला. गुणवत्ता सिद्ध केलेल्या इतरही अधिकाऱ्यांचा यथायोग्य सन्मान यावेळी करण्यात आला आहे.

ड सैनिकाने वाचनाची सवय लावून घेणे या आधुनिक काळात महत्वाचे

ड पारंपरिक युद्धतंत्रासमवेत आधुनिक सायबर युद्धतंत्र आत्मसात करावे

ड युद्धतंत्राचे परिवर्तित होणारे स्वरुप आत्मसात करण्याची आवश्यकता

ड सैनिकासाठी आणि सैन्याधिकाऱ्यासाठी वैचारिक क्षमतासंवर्धन महत्वाचे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article