मॉडर्न सीसीचा उपांत्य फेरीत प्रवेश
आरआरसी महिलांच्या क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेंगळूर येथे आरआरसी महिलांच्या अंातर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या गुऊवारी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मॉडर्न सीसीने सिक्स क्रिकेट अकादमीचा 17 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बेळगावच्या झोया काजीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. बेंगलोर येथे खेळविण्यात आलेल्या या सामन्यात मॉडर्न सीसीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 गडीबाद 150 धावा केल्या. त्यात स्तुती यमुने 4 चौकारासह 34, झोया काजीने 5 चौकारांसह 30, नित्या शेरीने 4 चौकारांसह 20, यासिका गौडाने 16, समृद्धीने 14, तर मानसीने 10 धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना सिक्स क्रिकेट अकादमीला 150 धांवाची गरज होती पण पावसाने हजेरी लावल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 105 धावानचे उद्दिष्ट समोर दिले. त्यानुसार सिक्स क्रिकेट अकादमीने 15 षटकात 7 गडीबाद 88 धावा केल्या. त्यात मानसी मोरेने एक षटकार 3 चौकारांसह 28, हर्षिताने तीन चौकारासह 26, दिया शहाने तीन चौकारांसह 21 धावा केल्या. मॉडर्न संघातर्फे करिष्मा, झोया काजी, नंदिनी चव्हाण, मानसी पुंदरे, यासिका गौडा यांनी प्रत्येकी एक गडीबाद केला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते झोया काजीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.