For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशात मॉडेल मेघना आलम अटकेत

06:16 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशात मॉडेल मेघना आलम अटकेत
Advertisement

सौदीच्या राजदूताला ब्लॅकमेल केल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशातील चर्चेत राहणारी मॉडेल मेघना आलमला 9 एप्रिल रोजी अटक करण्यात आली असली तरी त्याची माहिती आता समोर आली आहे. मेघनावर देशाची सुरक्षा धोक्यात आणण्याचा आणि वित्तीय हितसंबंधांना नुकसान पोहोचविण्याचा आरोप आहे. मेघना ही 2020 मध्ये मिस अर्थ बांगलादेशची विजेती राहिली आहे.

Advertisement

पोलिसांनी कुठल्याही आरोपपत्राशिवाय माझ्या मुलीला अटक केली आहे. तिच्यावर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा मेघनाचे पिता बदरुल आलम यांनी केला आहे. तर मेघनाला सौदी अरेबियाच्या राजदूतासोबत असलेल्या संबंधांमुळे अटक करण्यात आल्याचे समजते.

सौदी राजदूत आणि मेघना यांच्यात प्रेमसंबंध होते आणि माझ्या मुलीने त्यांच्यासोबत विवाह करण्यास नकार दिला होता, कारण सौदी राजदूत विवाहित असून त्याला मुले देखील आहेत असे बदरुल आलम यांनी म्हटले आहे. तर मेघना आलमने सौदी राजदूत इस्सा युसूफ यांना ब्लॅकमेल करत 5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 43 कोटी) लुटण्याचा प्रयत्न केला होता असा आरोप पोलिसांनी केला आहे.

राजदूत इस्सा हे इस्लामविरोधी कार्यांमध्ये सामील असल्याचा दावा मेघनाने अलिकडेच केला होता. इस्सा युसूफ पोलिसांद्वारे घाबरविण्याचा प्रयत्न करत मला सोशल मीडियावर सत्य पोस्ट करण्यापासून रोखू पाहत असल्याचे मेघनाने म्हटले होते.

स्वत:च्या अटकेपूर्वी मेघना ही फेसबुकवर लाइव्ह स्ट्रीम करत होती. त्यावेळी बांगलादेश पोलिसांची विशेष हेरशाखा डीबी पोलिसांनी तिच्या घरात घुसून तिला अटक केली आहे. मेघनाला बांगलादेशच्या विशेषाधिकार कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हा कायदा आरोपीला अनिश्चित काळापर्यंत ताब्यात ठेवण्याची अनुमती देतो. तर या घटनेने बांगलादेशातील मानवाधिकारांच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बांगलादेश सरकारचे कायदेशीर सल्लागार आसिफ नरुल यांनी मेघनाला झालेली अटक योग्य नसल्याचे वक्तव्य केले आहे.

Advertisement
Tags :

.