For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

15 टक्केपर्यंत वाढणार मोबाईल रिचार्ज

06:44 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
15 टक्केपर्यंत वाढणार मोबाईल रिचार्ज
Advertisement

त. भा. वृत्तसंस्था,

Advertisement

नवी दिल्ली

मोबाईल रिचार्ज येत्या काळामध्ये 15 टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोबाईल रिचार्ज महागणार असल्याचे समजते. याचसोबत  इंटरनेट शुल्कदेखील वाढणार आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

टेलिकॉम कंपन्या 12 ते 15 टक्के इतकी दरामध्ये वाढ करू शकतात. बाजारामध्ये सध्याला प्रामुख्याने तीन खासगी आणि एक सरकारी दूरसंचार कंपनी कार्यरत आहे. माहितीनुसार जून तिमाहीत देशातील तीन मोठ्या खासगी कंपन्या  जिओ, एअरटेल व व्होडाफोन आयडिया यांच्या वापरकर्त्यांच्या सरासरी महसुलामध्ये तिमाही आधारावर 1 ते दीड टक्का वाढ होऊ शकते. सध्याला बरेचसे ग्राहक 2जी नेटवर्क सोडून 4जी व 5जी नेटवर्क वापर करण्यासाठी धडपडत आहेत. यासोबत पोस्टपेड ग्राहकांची संख्या वाढलेली दिसून आली असून प्रति वापरकर्त्यांच्या माध्यमातून कमाईही चांगली होत असल्याचे सांगितले जाते.

देशामध्ये विविध कंपन्यांचे असणारे ग्राहक

कंपनी                                   ग्राहक संख्या

रिलायन्स जिओ                      52.96 कोटी

भारती एअरटेल                    37.61 कोटी

व्होडाफोन आयडिया            12.92 कोटी

बीएसएनएल                        2.75 कोटी

Advertisement
Tags :

.