महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोकाकमध्ये दुकान फोडून दहा लाखांचे मोबाईल लंपास

06:51 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाईन शॉपवरही डल्ला मारण्याचा प्रयत्न

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गोकाक शहरातील मध्यभागी असलेल्या एका मोबाईल दुकानाचे शटर उचकटून सुमारे 10 लाखांचे मोबाईल पळविण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून आणखी एक मोबाईल दुकान व वाईन शॉप फोडण्याचाही प्रयत्न झाला आहे.

बेळगाव शहर व जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. गोकाक येथील चोरीची घटना उघडकीस येताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामगोंडा बसर्गी, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक डी. एच. मुल्ला, पोलीस निरीक्षक आर. एस. जानर, उपनिरीक्षक के. बी. वालीकार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ओम एंटरप्रायझेस या मोबाईल दुकानाचे शटर उचकटून 9 लाख 95 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे 60 मोबाईल संच चोरट्यांनी पळविले आहेत. तेथून जवळच असलेल्या के. के. एंटरप्रायझेस हे मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. पंकज बार हे वाईन शॉपही फोडण्यात आले आहे.

परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. यापूर्वी मोबाईल दुकान फोडण्यासाठी पश्चिम बंगालमधील गुन्हेगारी टोळ्या बेळगाव परिसरात येत होत्या. बेळगाव शहर व जिल्ह्यातील अनेक दुकाने त्यांनी फोडली आहेत. चोरीच्या मोबाईलची नेपाळ, बांगलादेशमध्ये विक्री केली जाते.

चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरटे उत्तर भारतीय असावेत, असा संशय असून सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची संख्या 3 ते 4 आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article