For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात मोबाईल, वाहन व शस्त्रांवर बंदी

05:27 PM Feb 05, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोल्हापूर जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसरात मोबाईल  वाहन व शस्त्रांवर बंदी
Advertisement

                            कोल्हापूरमध्ये मतदानाच्या एक दिवस आधीपासून कडक निर्बंध लागू

Advertisement

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघासाठी नेमलेले मतदान केंद्र व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिकसुरक्षा संहिता आदेश निर्गमित केला आहे.

या आदेशानुसार, मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ पासून ते मतदानाच्या दिवशी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील जिल्हा परिषद वपंचायत समितीच्या मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल, वाहन, शस्त्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

Advertisement

यामुळे मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बुथ स्थापन करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे तसेच सर्व प्रकारची वाहने वापरणे यावर बंदीघालण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही व्यक्तीस मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट बाळगणे किंवा वापरणे तसेच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल, अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. >

Advertisement
Tags :

.