कैद्यांकडून मोबाईल, चार्जर-अन्य साहित्य जप्त
कारवार : येथील जेलमध्ये एकाच आठवड्यात घडलेल्या त्या दोन अहितकार घटनानंतर कैद्यांची अचानकपणे कसून तपासणी केली असता, कैद्यांकडे 7 बेकायदेशीर मोबाईल, चार्जर आणि अन्य साहित्य आढळून आले आहे. ही कारवाई प्रभारी जेल अधीक्षक मल्लिकार्जुन कोण्णूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. येथील जेल प्रशासनाने कैद्यांच्या बाबतीत कडक धोरणे अवलंबल्याने 7 डिसेंबर रोजी मंगळूर येथील कुख्यात कैदी मोहम्मद अब्दुल फयाम आणि निहाल कौशील यांनी जेलर कल्लाप्पा गस्ती आणि अन्य 3 कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर पुन्हा 9 डिसेंबरच्या रात्री मंगळूरच्या 6 कैद्यांनी अमलीपदार्थ पुरविण्यात आले नाही म्हणून जेलच्या कर्मचाऱ्यांशी वाद उकरुन काढला आणि जेलमधील टी. व्ही. संच फोडला व अन्य साहित्याची नासधूस केली होती. जेल आणि पोलीस प्रशासनाने त्या दोन घटनांची गांभीर्याने दखल घेतली असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व कैद्यांना अद्दल घडविण्यासाठी जेलमधील खोल्यांची कसून तपासणी केली. त्यावेळी कैद्यांच्याकडे 7 मोबाईल चार्जर आणि अन्य आक्षेपार्ह साहित्य आढळून आले.
मंगळूरच्या कैद्यांना अन्यत्र हलविले
येथील जेलमध्ये घडलेल्या त्या दोन्ही घटनांमध्ये मंगळूरच्या कैद्यांचा सहभाग आढळून आला आहे. येथील जेलमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि जेलच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मंगळूरच्या 4 कैद्यांना बळ्ळारी आणि बेळगाव (हिंडलगा) जेलमध्ये हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंगळूरच्या कैद्यांना 2 महिन्यांपूर्वी येथील जेलमध्ये दाखल करण्यात