बसमध्ये सापडलेला 50 हजाराचा मोबाईल प्रवाशाला परत
11:12 AM Jun 18, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
बस वाहक बी . एल कासार यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
एसटी बसमध्ये प्रवाशाचा सापडलेला ५०,००० रुपयांचा महागडा मोबाईल बस वाहकाने चौकशी करून त्या प्रवाशाला परत केल्याची घटना गुरुवारी सकाळी सावंतवाडी बस स्थानक येथे घडली. बस वाहकाच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता कुंभेश्वर - सावंतवाडी ही बस स्थानकात आल्यानंतर बसमधील सर्व प्रवासी उतरले. त्यानंतर वाहक बी एल कासार यांना बसच्या सीटवर सुमारे पन्नास हजार रुपयांचा मोबाईल दृष्टीस पडला. यावेळी वाहक बी एल कासार यांनी चौकशी केली असता हा मोबाईल या गाडीतून प्रवास करणारे संदीप सावंत यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा मोबाईल संदीप सावंत यांना परत करण्यात आला. त्यामुळे बस वाहक बी. एल कासार यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Advertisement
Advertisement