For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मोबाईल चोरट्याकडून पोलिसांवर दगडफेक; कॉन्स्टेबल कवळेकर यांनी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पाठलाग करून चोराला पकडले

12:11 PM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल चोरट्याकडून पोलिसांवर दगडफेक  कॉन्स्टेबल कवळेकर यांनी रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत पाठलाग करून चोराला पकडले
Advertisement

मडगाव : मोबाईल चोरी करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित चोरट्याने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत मडगाव पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल साईश कवळेकर जखमी झाले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Advertisement

मोबाईल चोरी करून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताने पोलिसांवर दगडफेक केली. या हल्ल्यात मडगाव पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल साईश कवळेकर जखमी झाले. डोक्याला दगड लागून रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेतही त्यांनी संशयिताचा पाठलाग सुरू ठेवला. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने समीर खान याला पकडण्यात पोलिसांना यश आले.

पोलिसांवर दगडफेक करण्याची ही घटना शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास आके-मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकनजीक घडली. पोलीस कॉन्स्टेबल साईश कवळेकर हे गंगा वाईन्सजवळ नियमित गस्तीवर असताना संशयित समीर खान हा तीन मोबाईल फोन घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्याच्याकडे मोबाईलबाबत विचारपूस केली असता, त्याने पोलिसांशी झटापट करून तेथून पळ काढला.

Advertisement

संशयित व्हिक्टर हॉस्पिटलच्या दिशेने पळत असताना कवळेकर यांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी संशयिताने मागून त्यांच्या दिशेने जोरात दगड भिरकावला. हा दगड बेट त्यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी पाठलाग थांबवला नाही. दरम्यान, परिसरातील नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाल्याने संशयिताला घेरून पकडण्यात आले. जखमी कॉन्स्टेबल साईश कवळेकर यांना तातडीने उपचारासाठी व्हिक्टर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी समीर खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक रणजीतकुमार देसाई पुढील तपास करत आहेत.

Advertisement
Tags :

.