For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईल फोन रिचार्ज 25 टक्क्यांनी वाढणार

06:27 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल फोन रिचार्ज 25 टक्क्यांनी वाढणार
Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर वाढ होणार असल्याची अहवालामधून माहिती 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

देशातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मोबाईल फोन ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो. कारण मोबाईल फोन रिचार्ज सुविधा देणाऱ्या कंपन्या निवडणुकीनंतर इंटरनेट बिलसोबत मोबाईल फोन रिचार्ज दरात वाढ करणार आहेत. सदरची माहिती ब्रोकरेज अॅक्सिस कॅपिटल यांनी दिली आहे. भविष्यात  ग्राहकांना मोबाईल फोन रिचार्जसाठी अधिक पैसे द्यावे लागतील, कारण टेलिकॉम कंपन्या टॅरिफ वाढीच्या चौथ्या फेरीच्या तयारीत आहेत.

Advertisement

रिचार्ज 25 टक्क्यांनी वधारणार

ब्रोकरेजने एका अहवालात म्हटले आहे की, बाजारात स्पर्धात्मक वातावरण सुरू आहे. 5 जी मध्ये प्रचंड गुंतवणूक केल्यानंतर नफा वाढवण्याची गरज आहे. यामुळे ऑपरेटर (दूरसंचाक कंपन्या) लवकरच दर 25 टक्क्यांनी वाढवतील. या वाढीचा शहरी आणि ग्रामीण वापरकर्त्यांवर समान परिणाम होऊ शकतो, असे अहवालात म्हटले आहे. शहरी ग्राहकांसाठी दूरसंचार खर्च 3.2 टक्के ते 3.6 टक्के वाढू शकतो. तर ग्रामीण ग्राहकांसाठी तो 5.2 टक्के वरून 5.9 टक्केपर्यंत वाढू शकतो.

महसूल 16 टक्के वाढेल

अॅक्सिस कॅपिटलचा अंदाज आहे की मुख्य दरांमध्ये अंदाजे 25 टक्के वाढ झाल्याने प्रति वापरकर्ता सरासरी महसूलमध्ये 16 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. रिलायन्स जिओने मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत 181.7 रुपये एआरपीयू नोंदवल्यानंतर हे आले आहे. तर भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने अद्याप मार्च तिमाहीचे आकडे उघड केलेले नाहीत. परंतु ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीसाठी त्यांचे आकडे अनुक्रमे 208 रुपये आणि 145 रुपये आहेत.

Advertisement
Tags :

.