जिल्हा कारागृहात बंदिवान पिता-पुत्राकडे सापडला मोबाईल
सातारा :
सातारा जिल्हा कारागृहात पित्रा-पुत्र बंदिवानाकडे मोबाईल फोन सापडला आहे. याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम राजु निकम व राजु उत्तम निकम (वय 50, रा. माहुली ता. खानापूर जि. सांगली) अशी त्यांची नावे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभम निकम व राजु निकम हे चोरीच्या गुह्यात सातारा जिल्हा कारागृहात असून त्यांच्याकडे मोबाईल फोन असल्याची माहिती करागृहातील पोलीस शिपाई राकेश पवार यांना मिळाली. त्यांनी दोघांची झडती घेतली. यावेळी मोबाईल फोन, सिमकार्ड, चार्जर, बॅटरी व आवश्यक साधनसाम्रुगी आढळून आली. बंदी असताना मोबाईल जवळ बाळगणे हा गुन्हा आहे. हे माहिती असतानाही त्यांनी आदेशाचा भंग केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई पवार यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार टोळे करत आहेत.