For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मोबाईल डेटाची किंमत १० वर्षांत ९७ टक्क्यांनी स्वस्त क्

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोबाईल डेटाची किंमत १० वर्षांत ९७ टक्क्यांनी स्वस्त क्
Advertisement

डेटा वापर 128 पटींनी वाढला : रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मोबाईलच्या वाढत्या वापरासह डेटा वापरही मोठ्या प्रमाणात स्वस्त होत गेल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून दिसून येत आहे. यामध्ये गेल्या दशकात देशात एक जीबी मोबाईल डेटाची किंमत सुमारे 97 टक्क्यांनी कमी झाली आहे. याच काळात प्रति ग्राहक सरासरी मासिक वायरलेस डेटाचा वापरही 128 पटींनी वाढला आहे. हा दावा देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

Advertisement

कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये एका जीबी मोबाईल डेटाची किंमत सरासरी 228 रुपये होती, जी आता कमी होऊन सुमारे 7.51 रुपये झाली आहे. दरम्यान, दरडोई मासिक डेटा वापर, जो 0.2 जीबीपेक्षा कमी होता, तो डिसेंबर 2025 पर्यंत 26.7 जीबीवर पोहोचला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी सज्ज होत असलेली रिलायन्स जिओ, 5 सप्टेंबर रोजी व्यावसायिक कामकाजाची 10 वर्षे पूर्ण करणार आहे.

मोबाईल इंटरनेट केवळ मनोरंजनापुरते नाही

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 2016 मध्ये मोबाईल ब्रॉडबँडची उपलब्धता मर्यादित होती आणि डेटाच्या जास्त खर्चामुळे लोक त्याचा वापर केवळ गरजेनुसारच करत असत. ते म्हणाले की, परवडणाऱ्या डेटाची आणि वेगवान नेटवर्कची वाढती उपलब्धता पाहता, मोबाईल इंटरनेटचा वापर आता केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आज त्याचा वापर व्यावसायिकांमध्ये तसेच शिक्षण, शिक्षा आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या कामांमध्येही वाढला आहे.

ते म्हणाले की, डेटाच्या दरात कपात झाल्यानंतर डिजिटल पोहोच वाढवण्यासाठी आता परवडणाऱ्या उपकरणांची उपलब्धता हे एक प्रमुख आव्हान आहे. त्यांनी कमी किमतीच्या 4 जी उपकरणांची आणि महागड्या स्मार्टफोनशिवाय वापरता येणाऱ्या डिजिटल सेवांची गरज असल्याचे निदर्शनास आणले. कंपनीचे लक्ष भारतात तंत्रज्ञान आणि साधने विकसित करण्यावरही आहे, जेणेकरून डिजिटल सेवांची पोहोच अधिक लोकांपर्यंत वाढवता येईल, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

डाउनलोड स्पीडमध्ये 27 पटींची वाढ

याच कालावधीत मोबाईल डाउनलोड स्पीड देखील 2.5 एमबीपीएसवरून 68 एमबीपीएसपेक्षा जास्त झाला आहे. रिलायन्स जिओने ‘अॅनालिसिस मेसन“ या कन्सल्टिंग कंपनीचा अहवाल आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या  डेटाचा हवाला देत सांगितले की, एका दशकात मोबाईल इंटरनेटच्या वापरात अनेक पटींनी वाढ झाली आहे. याच कालावधीत सरासरी मोबाईल डाउनलोड स्पीडमध्येही सुमारे 27 पटींनी वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :

.