‘मोबिक्विक’चा आयपीओ 31.30 पट सबस्क्राइब
वन मोबिक्विक सिस्टम लिमिटेड, विशाल मेगामार्ट आणि साई लाईफ सायन्सचे आयपीओ बाजारात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वन मोबिक्विक सिस्टम लिमिटेड, विशाल मेगा मार्ट आणि साई लाईफ सायन्स लिमिटेड यांच्या आयपीओसाठी बोली लावण्याचा शुक्रवारी अंतिम दिवस राहिला होता. मोबिक्विक आयपीओ शेवटच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत 31.30 पट ओव्हरसबस्क्राइब झाला.
रिटेल श्रेणीमध्ये 89.31 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीमध्ये 1.18 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये 52.87 पटीने इश्यूची सदस्यता घेण्यात आली. त्याचवेळी, विशाल मेगा मार्टचा आयपीओ 2.42 पट ओव्हरसबक्राइब झाला. रिटेल श्रेणीमध्ये इश्यूची सदस्यता 1.55 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीमध्ये 0.55 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये 6.95 पटीने घेतली गेली. तर, साई लाइफ सायन्सेसचा आयपीओ 1.62 पट ओव्हरसबक्राइब झाला. रिटेल श्रेणीमध्ये इश्यूची सदस्यता 0.54 पट, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीमध्ये 3.98 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीमध्ये 1.00 पटीने घेतली गेली.
मोबिक्विकचा आयपीओ :
वन मोबिक्विक सिस्टम्स लिमिटेड आयपीओद्वारे एकूण 572 कोटी उभारण्याचा विचार करत आहे. यासाठी, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 572 कोटी किमतीचे 20,501,792 शेअर्स ऑफर फॉर सेल किंवा ओएफएसद्वारे विकत आहेत.
विशाल मेगा मार्ट
विशाल मेगा मार्ट लिमिटेड आयपीओद्वारे एकूण 8,000 कोटी उभारण्याचा विचार करत आहे. यासाठी, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार 8,000 कोटी किमतीचे 1,025,641,025 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकत आहेत.
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड
साई लाइफ सायन्सेस लिमिटेड आयपीओद्वारे एकूण 3,042.62 कोटी उभारण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी, 2,092.62 कोटी किमतीचे 38,116,934 शेअर्स कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसद्वारे विकले जात आहेत. त्याचवेळी, साई लाइफ सायन्सेस 950 कोटी किमतीचे 17,304,189 नवीन शेअर्स जारी करत आहे.