‘मोबिक्विक’ला 3.59 कोटींचे नुकसान
जुलै ते सप्टेंबर तिमाहीमधील आकडेवारी जाहीर
मुंबई :
फिनटेक कंपनी मोबिक्विक सिस्टम लिमिटेडला आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 3.59 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 5.23 कोटी रुपयांचा नफा झाला होता. शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर कंपनीने प्रथमच चालू आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत मोबिक्विकचा एकत्रित महसूल वार्षिक 43 टक्क्यांनी वाढून 290.6 कोटी झाला आहे. एक वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 203.5 कोटी रुपये होता.
एकूण उत्पन्न 43 टक्क्यांनी वधारले
आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्नाच्या बाबतीत, कंपनीने 293.7 कोटी रुपये कमावले आहेत. ते वार्षिक आधारावर 42.02 टक्क्यांनी वाढले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 206.8 कोटी रुपये होता.
डिसेंबर 2024 मध्ये शेअर बाजारात लिस्ट
मोबिक्विकचे समभाग एनएसईवर 18 डिसेंबर 2024 रोजी 57.7 टक्क्यांवर प्रीमियमवर सुचीबद्ध झाले आहेत. हे बीएसईवर 58.5 टक्क्यांच्या प्रीमियमसह 442.25 रुपयांवर सूचीबद्ध झाले. तथापि, यानंतर, त्यात आणखी वाढ दिसून आली. तिमाही निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ झाली.