महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत जमावाने फोडले जल बोर्ड कार्यालय

06:50 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘जलसंकट’प्रश्नी भाजप-आप आमने-सामने

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीत भीषण जलसंकटामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शहरात ठिकठिकाणी निदर्शने, तोडफोड आणि गोंधळ सुरू आहे. यासंबंधी सोशल मीडिया साइट ‘एक्स’वर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये काही लोक छतरपूर येथील दिल्ली जल बोर्ड कार्यालयाची तोडफोड करताना दिसत आहेत. या फुटेजमध्ये डीजेबी कार्यालयात खिडकीच्या तुटलेल्या काचा आणि तुटलेली मातीची भांडी दिसत आहेत. आम आदमी पार्टीने (आप) या घटनेचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला असून तोडफोड करणारे हे भाजप नेते आणि कार्यकर्ते असल्याचा आरोप केला आहे. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाने जलसंकटाचा सामना करणारे लोक रागाच्या भरात काहीही करू शकतात, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना रोखल्याचा दावा केला. मात्र, या जलसंकटाच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

दिल्लीतील जलसंकटाच्या घटनेनंतर भाजप आणि आम आदमी पक्ष आमने-सामने आले आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना ‘भाजप झिंदाबाद’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्ते दिल्ली जल बोर्डाचे कार्यालय कसे पाडत आहेत ते पहा. एकीकडे हरियाणाचे भाजप सरकार दिल्लीच्या अधिकारात अडथळे आणत आहे, तर दुसरीकडे भाजप दिल्लीतील जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करत आहे. ते दिल्लीच्या लोकांचा इतका द्वेष का करतात?’ असा प्रश्न आपने उपस्थित केला आहे.

भाजपचे उत्तर

भाजप नेते रमेश बिधुरी यांनी आम आदमी पक्षाच्या आरोपांना उत्तर दिले आहे. ‘हे स्वाभाविक आहे. जेव्हा लोक रागावतात तेव्हा ते काहीही करू शकतात. त्या लोकांना नियंत्रित करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे’ असे त्यांनी म्हटले आहे.

द्वारका भागात तणाव

दिल्लीतील द्वारका भागातही पाणी समस्येवरून तणाव निर्माण झाल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक नळावरील पाणी भरण्यावरून झालेल्या वादात तीन जण जखमी झाले. त्यांना इंदिरा गांधी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी घटनेच्या संदर्भात पुष्टी दिली. दोन्ही पक्षांच्या जबाबाच्या आधारे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हाणामारीमध्ये कोणताही जातीय पैलू नसून तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article