For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधीक्षक कार्यालयावर जमावाचा हल्ला

06:04 AM Feb 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधीक्षक कार्यालयावर जमावाचा हल्ला
Advertisement

सुरक्षादलांसोबत झटापट : एकाचा मृत्यू : 30 जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसेमुळे तेथील स्थिती चिंताजनक ठरली आहे. राज्यात पुन्हा एकदा हिंसा भडकल्याने स्थिती बिघडली आहे. कुकीबहुल चुराचांदपूरमध्ये गुरुवारी रात्री सुमारे 400 जणांच्या जमावाने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर हल्ला केला आहे. यादरम्यान जमावाने शासकीय परिसरात घुसून जाळपोळ आणि तोडफोड केली आहे.

Advertisement

सुरक्षा दलांकडून वापरण्यात येणाऱ्या अनेक बसेस आणि ट्रक्सना जमावाने पेटवून दिले आहे. शेकडो लोक कार्यालयांमध्ये घुसले होते आणि त्यांनी शासकीय संपत्तीचे नुकसान केले आहे. सुरक्षा दलांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराचा वापर केला होता. सुरक्षा दलांसोबत झालेल्या झटापटीत एका इसमाचा मृत्यू झाला असून 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तत्पूर्वी जमावाने सुरक्षादलांवर दगडफेक केली होती.

जिल्हा पोलीस मुख्यालयातील एक हेड कॉन्स्टेबल एका व्हिडिओत जमावासोबत जाताना दिसून आला आहे. ही घटना उघडकीस येताच संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. स्थितीवर नजर ठेवली जात आहे.  जमावाच्या हल्ल्यानंतर स्थिती नियंत्रित करण्यासाठी त्वरित पावले उचलण्यात आली असल्याचे मणिपूर पोलिसांकडून सांगण्यात आले.

चुराचांदपूरचे पोलीस अधीक्षक शिवानंद सुर्वे यांनी हेड कॉन्स्टेबल सियामलालपॉल याला पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. तसेच त्याच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मणिपूरमध्ये मागील वर्षी तीन मे रोजी हिंसा सुरू झाली होती. राज्यात आतापर्यंत कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान भडकलेल्या हिंसाचारात 180 जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाली आहे.

Advertisement
Tags :

.