कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मनसेकडून अपंग व्यक्तीस व्हीलचेअर

12:56 PM Jun 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य .

Advertisement

मसुरे प्रतिनिधी

Advertisement

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत मालवण तालुक्यातील आडवली येथील अपंग व्यक्तीस व्हीलचेअर देण्यात आली. वय 45 वर्ष असणाऱ्या आणि शारीरिक दृष्ट्या 65% अपंग असणाऱ्या कुमारी रूपा लाड आई-वडिलांच्या सोबत राहते. चालता येत नसल्याने उचलून घेऊन आधार देत तिचे दिनक्रम करावे लागत. आई-वडील वृद्ध असल्याने व घरी कोण आणखी व्यक्ती नसल्याने गैरसोय होत होती. याविषयी कुटुंबीयांनी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्याकडे व्हीलचेअरची मागणी केली होती. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना ही व्हीलचेअर प्रदान करण्यात आली . याप्रसंगी जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर,जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते. या प्रसंगी कुटुंबीयांनी राज साहेब ठाकरे यांचे आभार मानले.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article