For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत

04:04 PM Jun 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क सुरळीत
Advertisement

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वेधले होते अधिकाऱ्यांचे लक्ष

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल नेटवर्क नसल्याने ग्राहक हैराण झाले होते. अर्धा अर्धा तास नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्ज फुकट जात होते.याबाबत जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर,उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ,तालुकाध्यक्ष मिलींद सावंत,विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत,विभागअध्यक्ष राकेश परब आदी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.उपस्थित बीएसएनएल आणि ट्रासफार्मर बदलण्यास दिरंगाई केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती.त्यावेळी मनसेच्या एका भेटीनंतर लगेच दोन दिवसात ट्रान्सफॉर्मर बदलून दिला.त्यामुळे बीएसएनएल नेटवर्क सेवा सुरळीत सुरु झाली आहे.यामुळे मळगाव पंचक्रोशीतील बीएसएनएल ग्राहकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत .

Advertisement
Advertisement
Tags :

.