Kolhapur : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात शाहूवाडीत मनसेचा वन विभागावर मोर्चा
शाहूवाडीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांवर ठोस उपायांची मागणी
शाहूवाडी : प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या आणि वन्यप्राण्यांकडून माणसासह जनावर आणि शेतीचे होणारे नुकसान या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढला . या र्चा मध्ये कार्यकर्त्यांनी गवा, बिबट्या व अन्य प्राण्यांचे ड्रेस परिधान करून तालुक्यातील वन विभागावर मोर्चा काढण्यात आला .
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे हिंस्र जंगली प्राण्यांचे रक्तरंजित हल्ले ,जंगली प्राण्यांच्या कडून पिकाचे होणारे प्रचंड नुकसान जंगली प्राण्यांच्या झालेल्या हल्ल्यात बाधित कुटुंबांना आपल्या खात्याकडून लवकरात लवकर मदत मिळावी. यासाठी विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला अनेक ठिकाणी बिबट्यांनी आज पर्यंत शेळ्या मेंढ्यांच्या वर हल्ले केले आहेत . अनेक ठिकाणी गाईगुरे अशा दुबत्या जनावरांच्या वररानटी गव्याने मनुष्य प्राण्यावर जीव घेणे हल्ले केले होते.
संबंधित बाधित लोकांना आपल्या प्रशासनाकडून तातडीची मदत लवकर मिळत नाही ती लवकर देण्यात यावी. संपूर्ण जंगलाला दर्जेदार कंपाऊंड करावे, जंगलातून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांच्या वरती सीसीटीव्ही ड्रोन कॅमेरे बसवावेत, या आशयाचे आज निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे म्हणाले, संपूर्ण तालुका भयभीत झाला असून वन्यप्राण्यांचे अलीकडे हल्ले वाढलेले आहेत यावर ठोस उपाययोजना करा अन्यथा पुढील काळात मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.