मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदेगटातील आमदार नाराज
मंत्रीपद हुकल्याने शिंदेगटातील दोन आमदार नाराज
मुंबई
राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडला. त्यानंतर काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रपद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये आता अजून भर पडली आहे. एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने, त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.
नागपूरमध्ये शिंदे गटातील आमदार प्रकाश सुर्वे आणि आमदार तानाजी सावंत यांसारख्या मंत्रीपद न मिळाल्याने, नाराजीने नेत्यांनी अधिवेशन सोडले. याप्रकणी आमदार प्रकाश सुर्वे यांनी दुःख व्यक्त केले पण तानाजी सावंत यांनी अधिवेशन सोडून थेट गावी घरी जाऊन आपली नाराजी व्यक्त केली.
आमदार प्रकाश सुर्वे ही तडक मुंबईला परतले. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. "मी नाराज नाही. पहिल्यादिवशी ही मी तेच सांगितले होते. मी लढवय्या कार्यकर्ता आहे. मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी दुःखी आहे. मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. मी माझं दुःख लपवणार नाही. मंत्रिमंडळात माझं नाव नाही." अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.