मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करणाऱ्या कर्नाटकातील आमदाराला कपडे फाटेपर्यंत मारले जाईल
ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा
कोल्हापूर
बेळगाव सह सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे, मुंबई केंद्रशासित प्रदेश करा असं वक्तव्य करून मराठी भाषिकांना डिवचणाऱ्या कर्नाटकातील आमदारा विरोधात आज राज्यभर संताप व्यक्त होत आहे. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौकात एकत्र जमत या आमदारान कर्नाटकची सीमा ओलांडून महाराष्ट्रात यावं त्याला कपडे फाटेपर्यंत मारलं जाईल असा इशारा दिला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे तिरक्या नजरेने बघायची कुणाची हिंमत झाली नाही, मात्र कर्नाटकातील सरकारचे आमदार जाणून बुजून अशी वक्तव्य करत आहेत, त्यांना वेळीच समज द्यावी अन्यथा या मंत्र्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाहीस, असा गर्भित इशारा शिवसेना उपनेते संजय पवार यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेना (उबाठा) चे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही वक्तव्य केले.