सोशल मीडियावरील प्रचारात आ. वैभव नाईक यांचा बोलबाला
मालवण | प्रतिनिधी
पूर्वीच्या काळात निवडणूक प्रचार म्हटला की गावागावात नेते मंडळी व कार्यकर्ते प्रचार फेरी काढायचे.तसेच लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले जायचे. विविध पत्रके वाटप केली जायची . मात्र , बदलत्या युगात हे सर्व मागे पडून डिजिटल माध्यमांचा वापर करून प्रचार सुरू झाला आहे.सध्या या प्रचारात आमदार वैभव नाईक यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. विविध रिल्सच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी केलेली कामे,आणलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचविताना ते दिसत आहेत.यात सध्या "निष्ठेचे पाईक,वैभव नाईक" बाबतची रिल्स व पोस्ट जोरदार चर्चेत आहेत.गेल्या काही वर्षात टप्प्याटप्प्याने पारंपरिक प्रचार मागे पडला असून बदलत्या माध्यमांचा वापर करत डिजिटल प्रचारावर भर देण्यात येऊ लागला आहे.पूर्वीच्या काळातील लाऊड स्पीकरच्या माध्यमातून होणारी आवाहने आता बंद होऊन मोबाईलच्या माध्यमातून थेट मतदानापर्यंत पोहोचण्याची पर्यायी साधने उपलब्ध झाली आहेत. अर्थात या साधनांचा उमेदवारांनी वापर केला नाही तर नवलच. अर्थातच या बदलत्या साधनांचा सध्या उमेदवार पुरेपूर वापर करताना दिसत आहेत .फेसबुक , व्हॉट्सअँप स्टेटस मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहेत. यात सध्या आमदार वैभव नाईक यांनी आघाडी घेतली आहे. मात्र यातील रिल्स या मतदारांसाठी, मच्छीमार बागायतदार ,सर्वसामान्य शेतकरी, जनतेसाठी त्यांनी काम केलेय,कोणकोणत्या योजना आणल्या. कोणत्या कामांसाठी निधी उपलब्ध करून कामे मार्गे लावली, यासंदर्भातील आहेत.या रिल्सना गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.