महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार उल्हास तुयेकर यांचा तेलंगणातील प्रचारात सहभाग

12:11 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मडगाव : नावेलीचे आमदार व कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर हे निवडणूक प्रचारासाठी तेलंगणात दाखल झाले असून भाजपशी युती असलेल्या जनसेना पक्षाचे कोडाड मतदारसंघातील उमेदवार सतीश रे•ाr यांच्या प्रचारात ते सहभागी झाले आहेत. तेलंगणात 119 जागांसाठी 30 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. 119 पैकी 110 मतदारसंघांत भाजप, तर 9 मतदारसंघांत भाजपशी युती असलेला जनसेना पक्ष निवडणूक लढवत आहे. कोडाड मतदारसंघात सुमारे 2 लाख 30 हजार मतदार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यासह भाजपचे गोव्यातील मंत्री-आमदार मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगण येथील निवडणूक प्रचारात सहभागी झाले आहेत. तुयेकर कोडाड मतदारसंघातील प्रचारात सहभागी झाले आहेत. प्रचाराच्या नियोजनासाठी मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बैठका घेणे, मार्गदर्शन करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तुयेकर यापूर्वी महाराष्ट्रातील पनवेल, रत्नागिरी, कर्नाटकातील भटकळ आदी मतदारसंघांतील भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झालेले आहेत. तेलंगणातीलच भूपालपल्ली मतदारसंघाला महिन्याभरापूर्वी भेट देऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या प्रक्रियेतही ते सहभागी झाले होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article