एसएसएलसीच्या विद्यार्थ्यांशी आमदार सेठ यांनी साधला संवाद
धैर्याने परीक्षेला सामोरे जाण्याचा दिला सल्ला
बेळगाव : बेळगाव शहरातील मराठी माध्यम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा शिबिराचे आयोजन महिला विद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जाण्याचा सल्ला दिला. डाएटचे वरिष्ठ प्रा. शरीफ नदाफ, गटशिक्षणाधिकारी रवि बजंत्री, आय. डी. हिरेमठ, रिझवान नावगेकर, ए. एच. यळ्ळूरकर, दीपाली जाधव, अरविंद पाटील, व्ही. एन. पाटील, एस. ए. कळ्ळेकर, एन. डी. पाटील, एन. ओ. डोणकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात गटशिक्षणाधिकारी रवि बजंत्री यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी माहिती दिली. त्यानंतर पी. आर. पाटील, संजीव कोष्टी यांनी गणित व कन्नड विषयांसाठी मार्गदर्शन केले. प्रा. आनंद गाडगीळ यांनी करिअर गायडन्सवर मार्गदर्शन केले. एच. बी. पाटील यांनी आभार मानले.