For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदारांकडून किल्ला तलाव विकासकामांचा आढावा

11:25 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
आमदारांकडून किल्ला तलाव विकासकामांचा आढावा
Advertisement

बेळगाव : किल्ला तलाव येथील विकासकामे वेगाने केली जात आहेत. बांधकामाच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आमदार आसिफ सेठ यांनी किल्ला तलावाला भेट दिली. महापालिकेच्या अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कामाची सविस्तर माहिती घेतली. कामाचा दर्जा उत्तम प्रकारचा राखण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. आजूबाजूचे पाणी किल्ला तलावामध्ये मिसळले जाऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक, अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.