For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार राजू सेठ यांची रामतीर्थनगर येथे पाहणी

10:49 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
आमदार राजू सेठ यांची रामतीर्थनगर येथे पाहणी
Advertisement

शिवालय तसेच बुडाच्या विकासकामांचा घेतला आढावा

Advertisement

बेळगाव : बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी रामतीर्थनगर येथील शिवालयात सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा घेतला. मंदिरात सुरू असलेल्या बांधकामाचा दर्जा तसेच नागरिकांची मते जाणून घेऊन त्यानुसार विकासकामे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच बुडा अंतर्गत अनेक विकासकामे राबविली जात असून त्याचीही पाहणी करण्यात आली. रामतीर्थनगर येथील शिवालय परिसरात सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. बांधकामासोबतच भविष्यातील देखभालीसंदर्भात आमदार सेठ यांनी नागरिकांशी चर्चा केली. याबरोबरच या परिसरातील समस्यादेखील त्यांनी जाणून घेतल्या. सर्व समस्यांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद 

Advertisement

आमदार राजू सेठ यांनी बुधवारी सरदार्स हायस्कूल व पदवीपूर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांना एसएसएलसी तसेच पीयुसी परीक्षेदरम्यान येणाऱ्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. तसेच सीईटी,नीट या स्पर्धात्मक परीक्षांसाठी मार्गदर्शनही केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा हव्या असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी प्राध्यापक तसेच शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.