Kolhapur : आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र पुष्कराज विवाहबद्ध; कोल्हापुरात भव्य सोहळा पार
पुष्कराज–पूजा विवाह सोहळा कोल्हापुरात दिमाखात
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र पुष्कराज आणि पूजा (युबराज हिंदुराव पाटील, रा. खुपीरे, ता. करवीर यांची सुकन्या) यांचा विवाह सोहळा रविवारी (दि. २३) कोल्हापूर शहरातील पोलीस ग्राऊंड येथे मोठ्या थाटात पार पडला.
वधु-वरांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार शाहू छत्रपती, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, दैनिक पुढारीचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव, अदृश्य काडसिध्देश्वरस्वामीजी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धैर्यशिल माने, खासदार विशाल पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, आमदार शेखर निकम, आमदार जयंत आसगांवकर, भिडे गुरूजी, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर,माजी आ. मालोजीराजे, माजी आ. जयश्री जाधव, माजी आ. सुरेश साळोखे, माजी आ. संजय घाटगे, माजी आ. प्रकाश आवाडे,
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, उद्योजक संजय घोडावत, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे, जनसुराज्य पक्षाचे समीत कदम, राजेश पी. पाटील, शिवसेनेचे सत्यजित कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मुस्लीम बोर्डीगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी महापौर सुनिल कदम, अॅड. महादेवराव आडगुळे, गोकुळचे संचालक अरूण डोंगळे, पैलवान चंद्रहार पाटील, बाळ पाटणकर, जयंत पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, वैशाली श्रीरसागर, ऋतुराज क्षीरसागर, दिशा क्षीरसागर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी कु.कृषराज, कु. आदिराज हेही उपस्थित होते.