आमदार राहुल आवाडेंनी केला वृक्ष लागवडीचा संकल्प
कोल्हापूर
राहुल आवाडे पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत. जितकं मताधिक्य आहे तेवढे वृक्षारोपण करणार असा संकल्प आमदार आवाडे यांनी यावेळी केला आहे. इचलकरंजी मतदार संघातून भाजपचे आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या आजोबांच्या पर्यावरणाचे जनत या संकल्पनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
विधानसभा निवडणूकीमध्ये ५६ हजार ८११ इतक्या मताधिक्याने ते निवडून आले. जनतेनं मला निवडून दिलं, मी या जनतेचे काहीतरी देणं लागतो, यासाठी मतदार संघ व परिसरात ५६ हजार ८११ एवढे वृक्ष रोपण करुन जनहित सार्थकी लावण्याचा संकल्प आमदार राहुल आवाडे यांनी केला आहे.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र असलेले आमदार राहुल आवाडे इचलकरंजीला वायू प्रदुषणातून मुक्त करण्यासाठी हा संकल्प केला आहे. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात केलेली वृक्षलागवड लौकिकास पात्र ठरली आहे. याच धरतीवरी वस्त्रनगरी आणि औद्योगिकनगरी असलेल्या इचलकरंजीला वायू प्रदूषणमुक्त होण्यासाठी हा संकल्प करण्यात आला आहे. या निसर्गाल समृद्ध करण्याच्या कार्यात नागरिकांनी ही करावा, असे आवाहन आमदार आवाडे यांच्यातर्फे करण्यात आले.