For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या सिंचनाच्या कामाची जाण जनता ठेवेल- आमदार प्रकाश आबिटकर

02:16 PM May 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
स्व  सदाशिवराव मंडलिक यांच्या सिंचनाच्या कामाची जाण जनता ठेवेल  आमदार प्रकाश आबिटकर
MLA Prakash Abitkar
Advertisement

 : राधानगरी तालुक्यात मंडलिकांच्या प्रचार बैठकांना वाढता प्रतिसाद

राधानगरी प्रतिनिधी

लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. मात्र बुद्धिभेद करून निवडणूक भावनिक करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. हा त्यांचा कुटील डाव राधानगरी तालुक्यातील जनता उधळून लावेल आणि स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या सिंचनाच्या कामाची जाण जनता ठेवेल, असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील गुडाळ, गुडाळवाडी, करंजफेण, कुडूत्री, सोन्याची शिरोली, पडळी, चौगलेवाडी, पिरळ, कात्रेटवाडी, दुर्गमानवाड, राणेवाडी, धामणे, फेजीवडे, राधानगरी आदी गावात प्रचार बैठका झाल्या.

Advertisement

आबिटकर म्हणाले, ज्या ज्या वेळी राधानगरी तालुक्यातील लोकांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्या त्या वेळी खासदार संजय मंडलिक मदतीला धावून आले. 60 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधले हे सर्वमान्य असताना हे धरण आताच्या काँग्रेसच्या उमेदवारांनीच बांधल्याचा बुध्दिभेद करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यांचा हा कुटील डाव राधानगरी तालुक्यातील सुज्ञ जनता उधळून लावेल. स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी अन्य तालुक्याचा विरोध असतानाही 1994 मध्ये काळम्मावाडीचे नऊ टीएमसी पाणी गैबीबोगद्यातून भोगावती नदीत सोडले. याची जाणीव लोकांना आहे. त्यामुळे विरोधकांचा अप्रचाराला जनता बळी पडणार नाही. राधानगरी तालुक्यातील लोक विकासाचा ध्यास घेतलेल्या प्रा. संजय मंडलिक यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वासही आबिटकर यांनी व्यक्त केला.

उमेदवार प्रा. संजय मंडलिक म्हणाले, पंतप्रधान मोदींनी या भारताला जगभरात मानसन्मान मिळवून दिला. देशात 116 प्रकारच्या विविध योजना राबवून लोकांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न केले. विकसित भारताला मोदींशिवाय पर्याय नाही. तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि 400 चा टप्पा पार करण्यासाठी आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मंडलिक यांनी केले. प्रचार बैठकींना तानाजीराव चौगले, संभाजीराव जाधव, विलास रणदिवे, बबन महाडिक, विलास चौगले, राजू भाटले, धनाजीराव चौगले, शिवाजीराव पाटील, संग्राम पाटील आदींसह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले गटाचे त्या त्या गावातील प्रमुख कार्यकर्ते हजर होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.