For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला! 'करवीर'चे आमदार पी. एन. पाटील- सडोलीकर यांचे निधन; काँग्रेस कार्यकर्त्यांना जबर धक्का

07:08 AM May 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरपला   करवीर चे आमदार पी  एन  पाटील  सडोलीकर यांचे निधन  काँग्रेस कार्यकर्त्यांना जबर धक्का
Advertisement

काँग्रेसचे निष्ठावान नेते आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांची आज अखेर मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अॅस्टर आधार हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतला. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावर उपचार चालू होते. नाजूक परिस्थिती असताना त्यांच्यावर शर्तीने करण्यात आले पण त्याला अपयश आले . पी.एन.पाटील यांच्या निधनाने काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता हरवला असून यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

कोल्हापूरच्या राजकारणातील अध्वर्यू, काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि गांधी घराण्याचे निष्ठावान असे ओळख असलेले करवीर विधानसभा मतदार संघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची बातमी अखेर समोर येत आहे.

घरी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली होती त्यामुळे त्यांना अॅस्टर आधार येथे दाखल करण्यात आले होते यावेळी त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेली आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी मेंदूला सूज आल्याचे निदर्शनास आले. पी एन पाटील त्यांच्यावर शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या उपचारासाठी मुंबईचे प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉक्टर बराले यांना कोल्हापुरात आणले होते .

Advertisement

त्यांच्यावर उपचार होत असताना प्रकृती गंभीर असून असली तरी स्थिर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नेत्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारची धाकधूक वाढली होती.

गेल्या चार दिवसांपासून आपल्या लाडक्या साहेबांच्या प्रकृतीसाठी पाण्यात देव घालून बसलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना या बातमीमुळे मोठा धक्का बसला आहे. आपले साहेब आपल्याला सोडून गेले याची माहिती मिळताच हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या कट्टर कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. अनेक कार्यकर्ते साहेबांच्या आठवणीने ओक्साबोक्सी रडत होते

सडोली खालसा येथे अंत्यसंस्कार 

करवीर तालुक्यातील सडोली खालसा या मूळ गावी पी. एन. पाटील यांचे अंत्यसंस्कार होणार आहेत. ते आपल्या नावासमोर नेहमी पी.एन.पाटील सडोलीकर असा गावचा उल्लेख करायचे. पण राजकारणातील व्यस्ततेमुळे ते कोल्हापुरातील राजारामपुरी राहत होते. पण आता त्यांच्या पार्थिवावर सडोली खालसा येथे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.