For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आमदार नितेश राणे २८ ला दाखल करणार उमेदवारी अर्ज

11:12 AM Oct 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आमदार नितेश राणे २८ ला दाखल करणार उमेदवारी अर्ज
Advertisement

खासदार नारायण राणे, रविंद्र चव्हाण, निलेश राणे दीपक केसरकर, विश्वजित राणे यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement

कणकवली /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे आमदार नीतेश राणे हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. आपल्या मागील दोन टर्म मध्ये विधानसभा कामकाज आणि भाजपा संघटना यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि ते महाराष्ट्रातील हिंदू जनतेच्या मनातील ताईत झालेले आहेत असे असूनही आपल्या संपूर्ण मतदारसंघात त्यांनी आपल्या दांडग्या जनसंपर्कामुळे लक्षणीय काम उभे केलेले आहे.म्हणूनच भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघात साठ -पासष्ट हजाराहून अधिक मताधिक्याची अपेक्षा आहे.आपल्या राज्यातील व्यस्त कामातून सुद्धा त्यांनी एक आदर्श असा मतदारसंघ तयार केलेला आहे.मतदारसंघात विकासाची गंगा आणलेली आहे,जवळपास सर्वच सत्तास्थाने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात घेतल्याने त्यांच्यासमोर उमेदवारी देण्यासाठी विरोधी पक्षाची सुद्धा फार मोठी दमछाक झाली.सोमवारी सकाळी १२ वाजता हजारोंच्या संख्येने मान्यवर मंडळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीने गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय असे निघणार आहेत. त्यानंतर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करून उप जिल्हा रुग्णालय कणकवली समोरील मैदानात जाहीर सभा संपन्न होणार आहे.यावेळी भाजपा खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, गोव्याचे मंत्री आणि कोकण प्रभारी विश्वजित राणे तसेच जिल्ह्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीचे हितचिंतक तसेच जनता यांनी मोठ्या संख्येने यात सामील व्हावे असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.