महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये प्रवेश

05:50 PM Apr 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत

Advertisement

कणकवली /प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी कणकवली येथे भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सरपंच श्रीकृष्ण अनभवणे व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.यावेळी दाभोळे सरपंच अनभवणे यांच्या समवेत प्रदीप कुळकर, विनायक तेली, नरेश कुळकर, संदीप कुळकर, विवेक कुळकर, वसंत मालपेकर, पंकज कुळकर, किशोर चव्हाण, राजेश राऊळ, सुरज धुरी, गोपाळ मुळेये, विनायक राऊत,मनोहर राऊत, रवींद्र राऊत,ज्ञानेश्वर राऊत, संदीप राऊत, संतोष राऊत, राजेंद्र राऊत,जयेश थोटम, पप्या घाडी आदींनी प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर, नंदू देसाई,प्रदीप देसाई, शशिकांत गोठणकर, पिंटू लाड गावकर,उमेश गोठणकर आधी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

कणकवली मतदारसंघाचा विकास आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.या विकास प्रक्रियेत दाभोळे गावाचा ही सहभाग असावा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केलेला आहे. महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत आहे.कोकणचा विकास होत आहे. त्यामुळेच नामदार नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आणि पक्षप्रवेश करत असल्याचे श्री. अनभवणे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
# nitesh rane# tarun bharat news#
Next Article